Ad will apear here
Next
‘रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठीच्या केंद्रीय निधीमुळे ग्राहकांचा विश्वास मिळवणे शक्य’
अर्थ मंत्रालयाचे उपसचिव पवन कुमार यांचे मत

पुणे : ‘रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्माण केलेला २५ हजार कोटींचा विशेष निधी अर्थात ‘स्ट्रेस प्रोजेक्ट्स फंड’ हे बांधकाम क्षेत्राच्या समस्यांवरील अंतिम उत्तर नाही; परंतु जेव्हा सरकार व इतर वित्तीय संस्था रखडलेल्या गृहप्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतील तेव्हा सामान्य ग्राहकासाठी ती आश्वासक बाब ठरेल. गृहनिर्माण व्यवसायावरील ग्राहकांचा गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी यामुळे मदत होईल,’ असे मत अर्थ मंत्रालयाचे उपसचिव व गुंतवणूक संचालक पवन कुमार यांनी व्यक्त केले.

क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे या निधीविषयी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात पवन कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधला.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख गुंतवणूक अधिकारी इरफान काझी, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव आदित्य जावडेकर, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य सचिन कुलकर्णी, संस्थेचे महासंचालक डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का यांच्यासह पुण्यातील विविध नामांकित गृहनिर्माण संस्थांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.  

‘जे गृहप्रकल्प तात्पुरत्या स्वरूपात ‘लिक्विडिटी’ (आर्थिक तरलता) नसल्यामुळे रखडले आहेत आणि ठराविक रकमेच्या मदतीनंतर गृहप्रकल्प पूर्ण होऊन समस्या सुटणार आहे, अशाच गृहप्रकल्पांना केंद्र सरकारच्या या निधीचा फायदा होणार आहे, असे सांगून पवन कुमार म्हणाले, ‘सर्व सार्वजनिक बँकांसह खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक अशा १३ बँका या निधीमध्ये सहभागी झाल्या आहेत. रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी निधी उभा करणे हा सरकारचा एक धाडसी निर्णय असून, व्यावसायिक शिस्तीने आणि वेगाने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्राची विश्वासार्हता परत आणण्याचा उद्देश आहे.’

काझी यांनी या निधीविषयीच्या शंकांचे निरसन केले. ते म्हणाले, ‘देशात १५०९ गृहप्रकल्प व ४.५८ लाख सदनिका निधीअभावी रखडलेल्या अवस्थेत आहेत. ‘स्ट्रेस प्रोजेक्ट्स फंड’ हा केवळ बांधकामासाठीच वापरता येणार असून, त्यातून सध्या सुरू असलेले कर्जाचे हफ्ते फेडता येणार नाहीत. या निधीच्या वापरासाठी प्रकल्प हा परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत किंवा ‘मिड-इन्कम’ श्रेणीत असणे, तसेच प्रकल्पाची रेरा नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. जे प्रकल्प सुरूच झालेले नाहीत त्यांना या निधीचा लाभ घेता येणार नाही. निधीचा लाभ मिळण्यासाठी किमान मर्यादा नसून, प्रति गृहप्रकल्प जास्तीत जास्त ४०० कोटी व प्रति बांधकाम व्यावसायिक ८०० कोटींपर्यंत मदत मिळू शकते.’

‘या निधीतून होणाऱ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुंतवणूक समितीत सरकार, एसबीआय किंवा एलआयसीच्या प्रतिनिधींचा समावेश नाही. बांधकाम व अर्थपुरवठा क्षेत्राची सखोल माहिती असलेल्या व्यक्ती या समितीत असून, त्यांची नावे गुप्त राहतील,’ असेही काझी यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZBPCH
Similar Posts
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील पाच सीएनजी स्टेशन्स देशाला अर्पण पुणे : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शनिवारी, २८ डिसेंबर २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातील पाच सीएनजी स्टेशन्स देशाला अर्पण करण्यात आली, तसेच या वेळी जाटेगाव येथे टॉरंट ग्रुपच्या सिटी गॅस स्टेशनची पायाभरणी करण्यात आली. कंपनीच्या वतीने आणखी ४५ गॅस स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
फ्लॅट खरेदी आणि नवे निकष रेरा कायद्यामुळे फ्लॅट घेताना गुंतवणूकदारांना बऱ्याच गोष्टींची शाश्वती लाभत असली तरी रेराची मान्यता ही बांधकाम सुरू करण्यासाठी असते. शक्यतो तयार फ्लॅट घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आजच्या काळात फ्लॅट घेताना काही बाबतीत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्या विषयी....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language